top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
'अलीबाबा'चे संस्थापक जॅक मा दोन महिन्यांपासून गायब
चीनचे अब्जाधीश आणि अलीबाबा समुहाचे संस्थापक जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये वादग्रस्त भाषण देत चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केली होती. तेव्हापासून जॅक मा कुठेही दिसलेले नाहीत.त्यामुळे ते बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 'आफ्रिका बिझनेस हिरोज' या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित न राहिल्याने हा संशय अधिकच बळावला आहे. जॅक मा हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या फेरीत त्यांच्या जागी अलीबाबा समुहाच्या कार्यकारी अधिकाऱ्याने हजेरी लावली, असं यूके टेलिग्राफचं म्हणणं आहे. त्यांचा फोटोही वेबसाइटवरुन काढून टाकण्यात आला आहे. वेळेअभावी जॅक मा यांना सहभाग घेता आला नाही असं अलीबाबा समुहाच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.
bottom of page