top of page

अण्णा हजारे हे अविश्वासू आणि मॅनेजेबल व्यक्तिमत्व

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन आपले उपोषण स्थगित करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जोरदार टीका केली आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व असल्याचे सांगत अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, असे वक्तव्य डॉ. मुणगेकर यांनी केले आहे. अण्णांचे बोलविते धनी आता समोर आले असून अण्णा अनरिलायबल( विश्वास न ठेवण्याजोगे) आणि मॅनेजेबल असल्याचा घणाघातही डॉ. मुणगेकर यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

bottom of page