top of page

कृषी कायद्यांच्या संविधानिक वैधतेवर उद्या निर्णय

केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या सुधारित कृषी कायद्यांच्या संविधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या (मंगळवार) निर्णय देणार आहे. तत्पूर्वी कोर्टाने सोमवारी शेतकरी आंदोलनाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी घेतली. तसेच केंद्र सरकारला यावरुन फटकारताना या कायद्यांची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये १५ जानेवारी रोजी पुढील बैठक होणार आहे. आतापर्यंत आठ बैठकी पार पडल्या मात्र अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याने उद्याच्या निणर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

bottom of page