top of page

अनुदानावर बियाणे उपलब्ध; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पीकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना हरभरा राजविजय-202, फुले विक्रम, हरभरा दिग्वीजय, हरभरा जॅकी-9218, रब्बी ज्वारी फुले सुचित्रा, मका बायो 9544 या वाण अनुदानावर मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. याकरीता आधारकार्ड आणि 7/12 उतारा, एका लाभार्थ्यास एका हंगामात एकदाच लाभ मिळेल, बियाणे विक्रेतास्तरावरुन वाटप होणार आहे, या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरीच बियाणे मिळण्यास पात्र राहतील असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

bottom of page