top of page

व्यापाऱ्याला ९ लाखांना गंडवलं

सोनं आणि त्यासारख्या मौल्यवान धातूंना आकर्षित करणारा बल्ब आहे असं सांगून तिघांनी एका व्यापाऱ्याला ९ लाखांना गंडवल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे या व्यापाऱ्याला बराच तोटा झाला होता. या तिघांनी त्याला बल्बमुळे तुझी भरभराट होईल अशी खोटी आशा दाखवली त्यामुळे तो भुलला. त्यांनी या व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला आणि मग त्याला बल्ब ९ लाखांना विकून व्यापाऱ्याला ९ लाखांना गंडा घातला. बरेलीतल्या या व्यापाऱ्याने चुटकन खान, मासूम खान आणि इर्फान खान (रा. लाखिमपूर खेरी) या तिघांविरोधात तक्रार नोंदवली आहे.

bottom of page