top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू
जगभरात कोरोना लसीमुळे आशादायी वातावरण तयार होत असताना नॉर्वेतून चिंतेत भर टाकणारी बातमी आली आहे. नॉर्वेमध्ये आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर नॉर्वेत २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे.फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर नागरिकांना उलटी, ताप यासारखा त्रास झाला. मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश मृत्यू हे गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे झाले आहेत.
bottom of page