top of page

'सीरम'कडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली असून सर्वजण कंत्राटी मजूर असल्याचे समजते. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत. असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत प्रतिक पाष्टे, महेंद्र इंगळे, रमाशंकर हरिजन , बिपीन सरोज, सुशीलकुमार पांडे या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

bottom of page