top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Tuesday, 11 August 2026
100 नक्षलवाद्यांची मध्य प्रदेशात घुसखोरी
छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सुमारे 100 नक्षलवाद्यांनी मध्य प्रदेशात घुसखोरी केली आहे. मध्य प्रदेशात आपला जनाधार वाढवावा यासाठी या नक्षलवाद्यांनी ही घुसखोरी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली असून या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अर्धसैनिक दलाच्या सहा तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. राज्यातील बालाघाट आणि आदिवासी बहुल मंडला जिल्ह्यात हे नक्षलवादी घुसले असण्याची शक्यता असून या ठिकाणी हे अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याचं मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितलं.
bottom of page