top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

आग आणखी भडकेल - येडीयुरप्पा

महाराष्ट्राची सर्वागीण वाढ झाली असून बेळगाव, कारवार, निपाणी हे कर्नाटकातील भाग महाराष्ट्रात आणावेत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी निषेध केला असून पवार यांच्या या वक्तव्याने या प्रश्नाची आग आणखी भडकेल असे म्हटले आहे. महाजन आयोगाचा अहवाल अंतिम आहे हे माहिती असताना त्यांनी हे विधान केले. बेळगावातील मराठी लोक हे आमच्या राज्यासाठी कन्नडिगांसारखे आहेत. मराठी लोकांच्या विकासासाठी आम्ही येथे महामंडळ स्थापन केले आह, असेही येडीयुरप्पा म्हणाले.

classi 2.jpg
bottom of page