top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

... तर स्त्रियांना दाढी येईल'

देशात लसीकरण सुरू असले तरी आपण ही लस घेणार नसल्याचे ब्राजीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. अमेरिकन कंपनी फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोएनटेक ही लस लोकांचं रुप बदलेल. ही लस घेतली तर लोक मगर होतील, नाहीतर महिलांना दाढी तरी उगवेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले, 'फायझरबरोबरच्या करारामध्ये हे स्पष्ट झालं आहे की, आम्ही (कंपनी) कोणत्याही दुष्परिणामांसाठी जबाबदार नाही. तर ही आपली समस्या आहे. ही लस घेतल्यानंतर जर तुम्ही सुपरह्युमन झाला, स्त्रियांना दाढी आली किंवा पुरुष स्त्रियांच्या आवाजात बोलू लागले तर ते त्याची जबाबदारी घेणार नाहीत."

classi 2.jpg
bottom of page