top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

अमेरिकेत एकाच दिवसात चार हजारांहून अधिक बळी

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मंगळवारी एकाच दिवसात चार हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत ४१९७ जणांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद मंगळवारी करण्यात आली. याआधी ७ जानेवारी रोजीच एकाच दिवशी ४१९४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

classi 2.jpg
bottom of page