top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

उत्तर प्रदेशात विवाहासाठीच्या धर्मातराविरोधात वटहुकूम जारी

उत्तर प्रदेशात जर एखाद्या महिलेने विवाहासाठी धर्मातर केले तर तो विवाह बेकायदेशीर ठरवला जाणार असूनज्यांना धर्म बदलायचा असेल त्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. विवाहाच्या नावाखाली सक्तीच्या आणि फसवून केलेल्या धर्मातराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या वटहुकमास राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता फसवून किंवा सक्तीने धर्मातर घडवून आणल्यास आरोपीला १० वर्षे तुरुंगवास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते.

उत्तर प्रदेशात बेकायदा धर्मातर अध्यादेश २०२० ला राज्यपालांनी मंजुरी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आठवडय़ात या अध्यादेशाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. जर विवाहासाठी कुणी फसवून व अप्रमाणिकपणे धर्मातर केले तर संबंधितांना १० वर्षे तुरुंगवास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा होईल. यात जबरदस्तीने धर्मातर केले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची राहील. हा गुन्हा दखलपात्र असून त्यात जामीन मिळणार नाही. धर्मातर केलेल्या व्यक्तीला किंवा तक्रारदाराला पाच लाख रुपये भरपाई देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. यातील खटले सत्र न्यायालयात चालवले जातील.

classi 2.jpg
bottom of page