top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

....म्हणून पाकिस्तानी नागरिकांना UAE ने व्हिसा देणं केलं बंद

कोरोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणं बंद केलं आहे. UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. पाकिस्तान बरोबरच टर्की, येमेन, सीरिया, इराक, इराण, सोमालिया, लिबिया, केनिया आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांना व्हिसा देणं ही यूएई सरकारने बंद केले आहे.

classi 2.jpg
bottom of page