top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

केंद्र सरकारचा ट्विटरला इशारा

केंद्र सरकारने ट्विटरला Farmer Genocide या हॅशटॅगशी संबंधित मजकूर आणि खाती हटविण्याच्या आदेशाचे पालन करावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. याबाबत केंद्राने ट्विटरला नोटीस बजावली आहे. माहिती-तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने ३१ जानेवारीला ट्विटरला चिथावणीखोर २५० खात्यांवर प्रतिबंध घालावा, असे निर्देश दिले होते. मात्र, ट्विटरने ही खाती पूर्ववत केल्याने केंद्राने नाराजी व्यक्त केली. ट्विटरने सरकारच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असून, तसे न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे केंद्राने या नोटिशीत म्हटले आहे. या नोटिशीत सरकारचे आदेश आणि अधिकार याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला देण्यात आला आहे.

classi 2.jpg
bottom of page