top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणं पडलं महागात !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं पायलटला चांगलंच महागात पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं तात्काळ पायलट मिकी मलिकला कामावरून काढून टाकले. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. मलिकच्या या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं. दरम्यान, या प्रकरणी गोएअरने मलिक यांना तडकाफडकी कामावरून कमी केलं आहे. “गोएअरची अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारण आहे. असं गोएअरच्या प्रवक्त्यांनी या कारवाईबद्दल बोलताना सांगितलं.

classi 2.jpg
bottom of page