top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

... ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही

बनावट TRP रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली. घडलेल्या प्रकरावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचं रिपब्लिक टीव्हीकडून सांगितलं जात आहे.

यावर भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. “कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली… महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत केली.

classi 2.jpg
bottom of page