top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

गुरुजींनी घेतला सक्तीच्या कोरोना चाचणीचा धसका

मुंबई : राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, १७ नोव्हेंबरपासून राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून सक्तीच्या तपासणीमुळे शिक्षकांनी कोरोना चाचणीचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

काेरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. १७ ते २२ नोव्हेंबर २०२० या दरम्यान कोविड-१९ आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणी केल्याशिवाय शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. शाळा सूरू होण्यापूर्वी वर्गखोल्यांचेही निर्जंतुकीकरण सक्तीचे आहे.

राज्यात २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

classi 2.jpg
bottom of page