top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकऱ्याचा मृत्यू

नंदुरबार : मागील दोन महिन्यापासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा या आंदोलनात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबरी गावातील महिला शेतकरी सीताबाई रामदास तडवी (वय-56 ) या 16 जानेवारीपासून शहाजहापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आज सकाळी त्यांचा थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सीताबाई तडवी यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख केले आहे. तसंच, केंद्र सरकार आपल्या अहंकारासाठी आणखी किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे? असा संतप्त सवाल थोरात यांनी थेट मोदी सरकारला विचारला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 70 हुन अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

classi 2.jpg
bottom of page