top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कराड जनता सहकारी बँकेनंतर आणखी एका बँकेचा परवाना RBI कडून रद्द

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे.. यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

२४ डिसेंबरला आरबीआयने बँकेच्या गैरकारभारामुळे कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. गुरुवारपासूनच बँकेचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने आधीच सुभद्रा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. आरबीआय यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान सुभद्रा लोकल एरिया बँक सर्व ठेवीदारांची भरपाई करण्यास समर्थ असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण १३ शाखा आहेत.

classi 2.jpg
bottom of page