top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

….तर पुढील चार महिने मिळणार मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत

राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, ही मुदत संपायला आता काहीच दिवस उरलेत. त्यामुळे नोंदणी कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे; मात्र आता याच महिन्यात, म्हणजे ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनोंदणी प्रक्रिया पूर्ण करीत सध्या सुरू असलेल्या तीन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे. याबाबतचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिले आहेत. दस्त नोंदणीचे प्रमाण वाढल्याने सुटीच्या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी शनिवार, तर २५ डिसेंबरला नाताळची सुटी आहे. मात्र, या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.

classi 2.jpg
bottom of page