top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शरद पवारांचा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण ....

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिलाच दौरा खान्देशमध्ये दौऱ्यावर जाणार होते. पण, सोमवारी रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्याची आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रोहिणी खडसे यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रातला नियोजित दौरा हा तुर्तास रद्द करावा लागला आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे यामुळे उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आणखी काही भाजपचे आजी माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनीच जाहीरपणे दिली होती. त्यामुळे पवारांच्या दौऱ्यात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता होती. पण, दौरा रद्द करण्यात आल्यामुळे हे कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले आहे. अद्याप राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, एकनाथ खडसे हेच क्वारंटाइन असल्यामुळे शरद पवारांना दौरा पुढे ढकलावा लागणार आहे.

classi 2.jpg
bottom of page