top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग संपूर्ण विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाचव्या मजल्यावर पाच मृतदेह सापडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिली, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे. संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिलं. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहितीसुद्धा राजेश टोपे यांनी दिलीय.

राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं यावेळी सांगितलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितलं. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचं अजित पवार आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या सर्व प्रकाराची माहिती घेऊन गंभीर दखल घेतलेली आहे.

classi 2.jpg
bottom of page