top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

स्टेट बँक ऑफ इंडियासह आठ बँकांना ४८३७ कोटींचा गंडा

हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या २५ वर्षांपासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम या क्षेत्रांमध्ये आयव्हीआरएसएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कार्यरत आहे. आरोपींनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांना ४८३७ कोटींची फसवणूक झाली आहे.

classi 2.jpg
bottom of page