top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

अंडी उधार दिली नाही म्हणून दोघांनी केली दुकानदाराची हत्या

वाई : अंडी उधार देण्यास नकार दिल्यामुळे पान टपरी चालकाची दोघांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सातारा कास रस्त्यावर यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ बबन गोखले (वय ४३ ) यांचं दुकान आहे. शुभम कदम, सचिन माळवे यांनी अंडी उधार देण्याची मागणी केली. पण, बबन गोखले यांनी अंडी उधार देण्यास नकार दिल्याने हे दोघांनी रागाच्या भरात बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये बबन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे

classi 2.jpg
bottom of page