top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार संजू सॅमसन

मुंबई : आयपीएलची फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सने संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला डच्चू दिला आहे. स्टीव्ह स्मिथबाबत निर्णय घेण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडून बरीच चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. संजू सॅमसन आता स्टीव्ह स्मिथच्या जागी कर्णधारपद सांभाळणार असून कुमार संगकाराला संघाचा नवा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्टीव्ह स्मिथसह वरुण एरोन, अंकित राजपूत, टॉम कुर्रन यांना देखील बाहेर करण्यात आलं आहे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानने आयपीएल 2020 मध्ये 14 लीग सामने खेळले त्यापैकी 6 सामने जिंकले आणि 8 सामन्यात पराभव झाला. गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानी होते. स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्याने या मोसमात 14 सामन्यांत 25.9.9 च्या सरासरीने 311 धावा केल्या ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता.

classi 2.jpg
bottom of page