top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या

सांगली : सांगलीमध्ये एका निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावात ही घटना घडली आहे. अण्णासो गव्हाणे असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर पत्नी मालन गव्हाणे आणि मुलगा महेश गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.

मुलगा महेश गव्हाणे याला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कर्जबाजारीतून कुटुंबाने आत्महत्या केली असल्याची गावात चर्चा आहे. मात्र, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. तिघांनी आत्महत्या करण्याइतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस शोध घेत आहे.

classi 2.jpg
bottom of page