top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

टीम इंडियासाठी बीसीसीआयचं फिटनेस टेस्टच 'टार्गेट’

मुंबई : खेळाडूंसाठी फिटनेस फार महत्वाचे असल्याने बीसीसीआयशी करार केलेल्या प्रत्येक खेळाडूला या फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 2 किलोमीटर रनिंग अनिवार्य केली आहे. खेळाडूंना हे 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. या ठराविक वेळेत हे 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण करावं लागणार आहे. वेगवान गोलंदाजांना 2 किलोमीटरचं अतंर 8 मिनिटं 15 सेकंदांमध्ये पूर्ण करायचे आहे. तर विकेटकीपर, स्पिनर आणि फलंदाजांना हे अंतर 8 मिनिटं 30 सेकंदात हे अंतर पूर्ण करावं लागणार आहे. या रनिंगद्वारे खेळाडू शारिरीकरित्या किती फिट आहे, हे पाहिलं जाणार आहे. या नव्या नियमाबाबतची माहिती खेळाडूंना देण्यात आली आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेपासून खेळण्यात येणार आहे. या मालिकेत खेळण्यासाठी खेळाडूंना ही फिटनेस टेस्ट देणं बंधनकारक राहणार आहे.

classi 2.jpg
bottom of page