top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

फुकट घरांच्या अफवेने उभारल्या झोपड्या

विक्रोळी- कांजूरमार्ग परिसरातील राज्य सरकारच्या भूखंडावर घरासाठी फुकट जागा मिळत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. मुंबईत घरासाठी फुकट जागा मिळत असल्याने झोपड्या बांधण्यासाठी गर्दी झाली. ही बाब लक्षात येताच पालिका आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून रविवारी या झोपड्यांवर कारवाई केली. विक्रोळी-कांजूरमार्गच्या दरम्यान असलेल्या भागात सरकारी मालकीच्या भूखंडांवर सरकारकडून बेघरांना फुकटात जागा दिली जात असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून ही अफवा सगळीकडे पसरली. मग हळुहळू एक - एक करत सुमारे ४०० कुटुंबांनी इथे बस्तान मांडले. 'ही जागा एका व्यावसायिकाची असून त्याने निधनांनंतर ही जागा गरिबांना दान दिली आहे,' अशा प्रकारची अफवा पसरल्याने या जागेवर गरजूंनी प्रचंड गर्दी केली. मुंबईसह विविध भागातून कुटुंबांचे लोंढे जमा झाले. सरकारी जमिनीवर झोपड्या उभ्या करण्याची लगबगदेखील वाढली. ही बाब पालिका आणि पोलिसांच्या नजरेस येताच त्यांनी हस्तक्षेप करत अवैध झोपड्यांवर कारवाई केली.

classi 2.jpg
bottom of page