top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

तरुणीवर धावत्या बसमध्ये बलात्कार

नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या तरुणीवर खासगी बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ६ जानेवारीला रात्री प्रवासादरम्यान ही घटना घडली. चाकूचा धाक दाखवून क्लिनरने तरुणीवर अत्याचार करण्यात आला.

5 जानेवारी रोजी २४ वर्षीय तरुणी खासगी बसने नागपूरहून पुण्याकडे जात होती. बसमध्ये चढल्यानंतर तिला सीट मिळालं नाही. थोड्या वेळाने क्लिनरने तिला बसच्या पाठीमागच्या सीटवर बसण्यास सांगितलं. बस सुरू झाल्यानंतर क्लिअनरने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकीही दिली.

बस पुण्यात आल्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून ती पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथे एका कंपनीत काम करते. पीडितेनं पुण्याजवळील रांजणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात असताना ही घटना घडल्यामुळे गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग केला.

तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक नागपूरला पाठवण्यात आलं आहे. ज्या बसमध्ये ही घटना घडली, ती बस मालेगाव पोलिसांनी पुण्यातून जप्त केली आहे. दरम्यान, पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीनंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

classi 2.jpg
bottom of page