top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

सामुहिक बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या पीडितेवरच पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार

सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवरचं तिथल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे घडला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची महिलेच्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश दिले आहेत.

जलालाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी पत्रकारांना सांगितलं की, ३० नोव्हेंबर रोजी ती आपल्या घरी पायी निघाली होती. यावेळी रस्त्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली त्यानंतर यातील पाच जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि ओढत जवळच्या शेतात नेऊन सामुहिक बलात्कार केला.

या प्रकारानंतर पीडित महिलेने जलालाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी या पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होता त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिथे बलात्कार केला. या दोन्ही धक्कादायक प्रकारांनंतरही पीडितेची तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे तीने थेट बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची बुधवारी भेट घेतली. त्यानंतर एडीजी चंद्रा यांनी महिलेच्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश दिले.

classi 2.jpg
bottom of page