top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भाजपा नेते राम कदम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

“हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची,” प्रतिक्रिया राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

classi 2.jpg
bottom of page