top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

... तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो – राजू शेट्टी

“सरकार शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करतेय, पाण्याचा फवारा मारतेय त्यामुळे परिस्थिती चिघळतेय. शेतकरी अशांत झाला तर देश अशांत होईल. फक्त पंजाब, हरयाणा आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांच हे आंदोलन नाही. हे देशाचं आंदोलन आहे. याच भान सरकारने ठेवावं. सरकारची भूमिका आईची असली पाहिजे. शेतकऱ्याला आरोपी ठरवू नये. त्याला समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची माथी भडकली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो” असे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आठ डिसेंबरला होणा-या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी असेल, असेही ते म्हणाले

classi 2.jpg
bottom of page