top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक बंद

दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एमआयडीसी जवळ केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पलटी झालेल्या टँकरला बाजूला करण्यासाठी क्रेन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. टँकर बाजूला करताना आग लागू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. या दुर्घटनेनंतर पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली असून सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू आहे. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. टँकर लवकरात लवकर महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, हा टँकर नेमका कशामुळे पलटला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

classi 2.jpg
bottom of page