top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

दिल्ली पोलिसांनी प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला. यामुळे काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना हटवलं असून ताब्यात घेतलं. दरम्यान राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी फक्त तीन नेत्यांना परवानगी दिली गेली आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

classi 2.jpg
bottom of page