top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले असून, त्यांची कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने आज सकाळी आठ वाजता प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील जवळपास १० ठिकाणांवर छापे मारले. ईडीच्या पथकात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांची झाडाझडती घेतली. 'टॉप्स सेक्युरिटी ग्रुप'शी संबंधित ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

classi 2.jpg
bottom of page