top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

ग्रा.पं. निवडणूक निकाल : हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचेच वर्चस्व

अहमदनगर : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु असून आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलला 7 तर विरोधकांना 0 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हिवरेबाजार बाजारमधील ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवल्याचंच पाहायला मिळत आहे.

classi 2.jpg
bottom of page