top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

चोरांना पाहताच पोलिसांनीच ठोकली धूम

पुणे शहरातील औंध परिसरातील सिद्धार्थनगर भागात एका सोसायटीमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास चार जण चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. तेथील वॉचमनला दोघा जणांनी चाकूचा धाक दाखवला आणि पकडून ठेवले. त्यानंतर बाकीचे दोघे सोसायटीत वर गेले. चोरांनी कटरच्या सहाय्याने फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या इमारतीत चोर आल्याचे लक्षात आल्याने सोसायटीमधील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन केला. थोड्यावेळाने दोन पोलीस बाइकवरून तिथे आले. नेमके त्याचवेळी चोर गेटमधून बाहेर पडत होते. चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाला आहे.पोलिसांनीच तेथून पळ काढल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. दरम्यान, औंध येथील सोसायटीमध्ये घडलेल्या घटनेची दखल चतुःशृंगी पोलिसांनी घेतली असून संबंधित पोलिसांचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

classi 2.jpg
bottom of page