top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कर्मचाऱ्यांची ‘नशा’ उतरविण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

पुणे: पुणे महानगरपालिकेनं आता आपल्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्यसनाचा विळखा सोडवण्यासाठी धडपडत असलेल्या कर्मचारी आणि सेवकांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च महापालिकेकडून उचलला जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य योजनेद्वारे हा खर्च केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजाही दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला जाणार असल्याची माहितीही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

classi 2.jpg
bottom of page