top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पिंपरीत नववर्षाची सुरुवात वाहन तोडफोडीने;१३ जण ताब्यात

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काही तरुण एकत्र आल्यानंतर त्यांनी मद्यपान केलं. दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यातूनच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सहा चारचाकी आणि रिक्षांचा काचा कोयत्याने फोडून हुल्लडबाजी केली. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मोहन नगर चिंचवड येथे ही घटना घडली. या प्रकरणी १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

classi 2.jpg
bottom of page