top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शस्त्रांसह फोटो काढणे तरुणांना पडले महागात

सोलापूर : हातात तलवार आणि कुऱ्हाड घेऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील सात तरुणांना पकडून अकलूज पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पिसेवाडी येथील शहाजी इंगळे, दीपक भाकरे, शैलेश भाकरे, महेश भाकरे, सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार सुरी, लाकडी दांडके घेऊन फोटो काढले होते आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले होते. हातात शस्त्र घेऊन काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जनसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सातजणांचा नेमका इरादा काय होतं? हातात शस्त्रं घेऊन त्यांना नेमकं काय करायचं होतं? त्यांनी शस्त्रे कोठून आणली ? असे प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी माळशिरस तालुक्यातील सात तरुणांना पोलिसांनी चांगलाच घडा शिकवत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

classi 2.jpg
bottom of page