top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

बर्ड फ्लूचा धोका वाढला !

परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्या मारण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, रविवारी पाटोदा (जि. बीड) तालुक्यातील मुगगाव येथे २६ कावळे मृतावस्थेत आढळलेल्या तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

classi 2.jpg
bottom of page