top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निवडणूक बंदी घालण्याची मागणी

दहाव्या अनुसूचीअंतर्गत आमदारांना सदनाच्या कार्यकाळादरम्यान पोटनिवडणूक लढण्यास बंदी घालवण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यासंदर्भात सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने थेट केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने या नोटीसला उत्तर द्यावे असे निर्देशही न्यायालयाने दिलेत. या याचिकेमध्ये काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी नुकत्याच देशात झालेल्या राजकीय घटनांचा संदर्भही दिला आहे. विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडतं. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सरकारमध्ये हेच सदस्य नेते बनतात, अशी उदाहरणं ठाकूर यांनी या याचिकेमध्ये दिली आहेत.

classi 2.jpg
bottom of page