top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

तरुणाने केली तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक

ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय तरुणाला शनिवारी अटक केली आहे. या तरुणावर ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांना फसवलं असून याद्वारे त्याने ७० लाख रुपयांना गंडा घातला आहे.अशा प्रकारे त्याने आणखी काहींना फसवलं आहे की काय याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सायबर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ४२० अन्वये तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कलम-६६-सी आणि ६६-डी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करताना आपण पैशांबाबत जितकी काळजी घेतो, तितकी काळजी ऑनलाईन शॉपिंग करताना घेत नाही हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

classi 2.jpg
bottom of page