top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

परंपरा कायम : १९७० पासून 'ही' ग्रामपंचायत बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निमित्ताने गावातील राजकारण चांगलचं तापत आहे तर काही ठिकाणी सरपंच तसेच सदस्यपदांसाठी बोलीही लागत आहे. असे असताना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची गेल्या पन्नास वर्षाची परंपरा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील धारागीर या गावातील ग्रामस्थांनी यंदाही कायम राखली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील धारागीर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. धारागीर ग्रामपंचायतीचे विशेष म्हणजे या गावात १९७० पासून एकदाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही. यंदा देखील धारागीर हे जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध निवडणूक होणारे पहिले गाव ठरले आहे.

एरंडोल तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेल्या धारागीर ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
गावातील ग्रामस्थांनी गावात एकी राहावी तसेच गाव सुखी राहावे यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा सुरू केला. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी ही संकल्पना राबविल्याने गावातील सलोखा व एकोपा आज देखील टिकून आहे. विशेष म्हणजे, गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्वाची संधी मिळत असल्याने स्पर्धा, हेवेदावे होत नाहीत.

classi 2.jpg
bottom of page