top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावू नयेत; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली:कोविड-१९ च्या रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावणे अयोग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेले आहे. कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्याबाबतच्या प्रकरणावर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे रुग्णांच्या घराबाहेर कोविड-१९ चे पोस्टर्स लावण्यासारखे कोणते कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आपत्कालिन प्रबंधन अनियनियमाअंतर्गत सक्षम अधिकाऱ्याने विशिष्ट निर्देश जारी केल्यानंतर अशा प्रकारची पोस्टर्स चिकटवली जाऊ शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे.एकदा का रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावल्यानंतर लोक अशा रुग्णांना अस्पृश्य मानतात असे सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीदरम्यान म्हटले होते.

classi 2.jpg
bottom of page