top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते....

नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि भाजपाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला होता. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असं भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे.

classi 2.jpg
bottom of page