top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने सामने आले आणि ....

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत भामा आसखेड पाणी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 'एकच वादा अजित दादा' विरुद्ध 'पुण्याची ताकद गिरीश बापट', अशा घोषणा देत कार्यकर्ते समोरासमोर आले.

भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळेच हे दोन नेते आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. दरम्यान, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या कोणत्याच प्रमुख नेत्याने या गोंधळावर भाष्य केलं नाही. माध्यमांना टाळत हे सर्वजण कार्यक्रम आटोपल्यानंतर निघाले.

classi 2.jpg
bottom of page