top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन

‘आशा’ या चित्रपटातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नरेंद्र चंचल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंचल यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे. चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले..त्यांनी प्रसिद्ध भजनांसह हिंदी चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतानेच नव्हे तर लोक संगीताद्वारेही लोकांची मनं जिंकली.

classi 2.jpg
bottom of page