top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

किर्तन सुरु असतानाच डोक्यात तबला घालून केली सहकाऱ्याची हत्या

दिल्ली : आर. के. पूरम येथील गुरुद्वारामध्ये किर्तनादरम्यान दोन कर्मचाऱ्यांचा झालेल्या वादात एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात तबला घातल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रविंद्र सिंग असं आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही या गुरुद्वारामध्ये ग्रंथी (म्हणजेच धर्मग्रंथ वाचणारी व्यक्ती) म्हणून काम करत होते. गुरुद्वारामधील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या खोल्यांमध्ये हे दोघेही राहत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आर. के. पूरम येथील सेक्टर सहामध्ये असणाऱ्या या गुरुद्वारेत दोघांमध्ये वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तबल्याचा वापर करुन डोक्यावर अनेकदा टपली मारल्याप्रमाणे हलका धक्का देत आरोपी दर्शन हा रविंद्रला त्रास देत होता. मात्र दर्शन वारंवार असं करत असल्याने रविंद्र संतापला आणि त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दर्शनने रविंद्रच्या डोक्यात तबला घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने रविंद्रचा मृत्यू झाला.

classi 2.jpg
bottom of page