top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या

एकीकडे सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना, दुसरीकडे मुंबईतील खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जान्हवी कुकरेजा असे या २१ वर्षीय तरुणीचे नाव असून खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या एका जोडप्याला अटक केली आहे.

खार परिसरात भगवती हाईट्स या इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील काही रहिवाशी, तसेच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी झाले होते. पार्टी सुरु झाल्यानंतर जान्हवी गच्चीवर पोहोचली. त्यावेळी त्या ठिकाणी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. जान्हवीने त्या जोडप्याला हटकत त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन या जोडप्याचा आणि जान्हवीचा वाद सुरु झाला. काही वेळाने हा वाद अगदी विकोपाला पोहोचला. त्या जोडप्याने जान्हवीला जबर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान जान्हवीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी जान्हवीला मारहाण करणाऱ्या त्या जोडप्याला अटक केली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम 302, 34 अंतर्गत चौकशी केली आहे. तसेच पार्टीत उपस्थित असलेल्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

classi 2.jpg
bottom of page